Wednesday, 31 July 2024

घर से कहाँ…

प्रिय ओम, “घर से स्कूल, स्कूल से कॉलेज कॉलेज से कहाँ-कहाँ घर से स्कूल, स्कूल से कॉलेज कॉलेज से कहाँ आवारा सड़को पे फिरो यहाँ से वहाँ, यहाँ से वहाँ यहाँ से वहाँ, यहाँ से वहाँ यहाँ से वहाँ…” आज, अतुल आणि एका मित्रासोबत बोलताना हे गाणं अचानक आठवलं. आपण दोघं, आत्या परभणीला बाई आणि आपल्याला भेटायला आल्यावर, तिला परत पिंगळीला सोडायला तिच्यासोबत जायचो. ऑटो चे तिकिट प्रत्येकी ७ रुपये असल्याने आणि तेही खूपदा आत्याच द्यायची, त्यामुळे आपल्याला आनंदाने आत्यासोबत जावसं वाटायचं. आणि जाताना ऑटो मधे मोठ्या आवाजात आपली आवडती गाणी ऐकायला मिळायची, हेही आणखी एक महत्त्वाचं कारण होतं. गाणी मला आणि विशेषत: तुला इतकी आवडायची की पिंगळी येऊच नये असं वाटायचं. मी त्यावेळी ११-१२ वीला आणि तू B.Sc (एग्री) ला होतास. आत्याचं आपल्यावर खूप प्रेम होतं (आहे) आणि आपण सर्वजण खूप मेहनतीने शिक्षण घेतो आहोत आणि अभ्यासात खूप हुशार आहोत, याचा तिला खूप अभिमान होता. परभणीला दोन-तीन दिवस आपल्यासोबत रहायला येताना आत्या एवढं दूध,तूप घेऊन यायची की आपण त्यातून कदाचित कधीच उतराई होऊ शकणार नाहीत. आपण, परत आत्या कडे गेलो की एक दिवस मुक्काम करून यायचो. आत्या, आपल्या पेक्षा बरीच श्रीमंत असल्याने, तो एक दिवसही आपण ती श्रीमंती (?) पाहण्यात दंग होऊन जायचो. मामा सुद्धा १०-१५ वर्ष सरपंच राहिलेला भारदस्त माणूस म्हणून आपल्याला त्यांच्या विषयी विशेष आदर होता. " असेच एक वेळेस आपण पिंगळी ला गेल्यानंतर, दुसऱ्या दिवशी सकाळी रविवार होता आणि सकाळी ‘रंगोली’ मध्ये, “घर से स्कूल, स्कूल से कॉलेज कॉलेज से कहा कहा आवारा सड़को पे फिरो यहाँ से वहाँ, यहाँ से वहाँ…” हे गाणं लागलं आणि मामा म्हणाले की तुम्ही कितीही अभ्यास केला तरी शेवटी रस्त्यावर बेकार म्हणून फिरण्यापलीकडे फार काही तुमच्या वाट्याला येणार नाही. मला खूप वाईट वाटलं, पण लहान असल्यामुळे कसं रिएक्ट होऊ कळालं नाहीस. तू मात्र त्या वेळी सुद्धा तुझ्या नेहमीच्या पद्धतीने जोरदार हसून विषय बाजूला केलास. कदाचित त्यांच्या बोलण्याने माझ्यावर काही परिणाम होऊ नये यासाठीचा तो प्रयत्न होता आणि कदाचित तुझा डिफेन्स मेकॅनिझम. पुढे मामाचा स्वभाव दाखवणारे अनेक उदाहरणे आपल्याला पाहायला मिळाली, पण आत्याच्या प्रेमापुढे त्याचं फार काही वाटलं नाही. एंड रेस्ट इज़ हिस्टरी •अमोल ३१/७/२०२४

No comments:

Post a Comment

Living Beyond Logic

For centuries, human beings have been thinking about how we make sense of the world. As someone who has always leaned towards science and ...