Tuesday, 21 November 2017

अप्रिय तरीही....


‘निन्दक नियरे राखिये, आंगन कुटी छवाय ।- कबीर प्रत्येकाला वाटते आपली स्तुती व्हावी भलेही ती खोटी का असेना असे असताना कबीर म्हणतात तूमच्या निंदकाला तुमच्या अंगणात जागा द्या.. हि गोष्ट साधी वाटत असेल पण इतकी सोप्पी नाही..निंदक कदाचित बऱ्याच वेळा तुमची जाणीवपूर्वक निंदा करत असेल , त्यात कदाचित तथ्यहि नसेल पण ते ऐकून घेण्याची आपली तयारी असणे आवश्यक आहे .. खूपदा आपण आपल्या विरुद्ध उच्चरला गेलेला एक शब्दहि सहन करू शकत नाही.. बऱ्याचदा आपल्या वागण्यातून आपला दुटप्पीपणा दिसून येतो.. खूपदा वैयक्तिक स्वार्थासाठी आपण हे करतो आणि आपणच आदर्श मानत असलेल्या तत्वांना हरताळ फासतो. खूपदा आपण समाजाच्या सो कॉल्ड धारणांमुळे सत्य माहित असूनही लपवतो, चुकीची भूमिका घेतो.. अश्या वेळी आपला वस्तुनिष्ठ टीकाकार आपल्या जवळ असणे फार गरजेचे ठरते आणि आपल्यावर झालेली टीका ऐकून घेणे महत्वाचे ठरते.. व्होल्टायर ने म्हटल्या प्रमाणे, मला तुझे मत मान्य नाही हे खरे असले तरी ते मांडण्याचा तुझा हक्क अबाधित राहवा यासाठी मी सदैव तुझ्या सोबत आहे. हि भूमिका प्रत्यक्ष जीवनात स्वीकारणे फार महत्वाची गोष्ट आहे.. इमॅन्युएल कान्ट चे categorical Imperative चा उल्लेख करणे ह्या संदर्भात गरजेचे आहे. कान्ट म्हणतो एखादी कृती केल्याने त्याचा चांगला परिणाम होतो किंवा तिचा आपल्याला फायदा होतो ह्यावरून त्या कृतीची नैतिकता ठरत नाही तर ती कृती नैतिक आहे म्हणून ती करावी भले त्याने आपल्याला कुठलाही फायदा होऊ शकत नसेल तरी.. विविध भारतीय दर्शनेही साधनसुचितेचे महत्व विशद करतात.. वरील गोष्टी वाचायला ठीक वाटतात पण प्रत्यक्ष कृतीची वेळ येते तेंव्हा काय असा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे.. जीवण्यात असे खूप प्रसंग येतात जेंव्हा आपला कस लागतो.. खुपदा आजचे मित्र, जिवलग उद्या दूर जातात त्या वेळी त्यांच्या विषयी आपले मत एकाएकी बदलता कामा नये किंबहुना त्यांच्याविषयी आदर असावा .. कदाचित ह्याच कारणामुळे विराट कोहलीने अनुष्का शर्मा विषयी केलेले ट्विट हे 2016 चे Golden Tweet ठरले असावे..

No comments:

Post a Comment

Living Beyond Logic

For centuries, human beings have been thinking about how we make sense of the world. As someone who has always leaned towards science and ...