Saturday, 9 January 2016

एक अनुभव

नवी दिल्लीच्या मेडिकल कॉलेजमध्ये post graduation करतानाची गोष्ट आहे. 2nd इयर एमबीबीएस च्या वार्षिक प्रात्यक्षिक परीक्षा सुरु होत्या, external examiner म्हणून दिल्ली बाहेरून दोन प्राध्यापक आमच्या वैद्यकीय महाविद्यालयात आले होते त्या पैकी एक जण बनारस हिंदू विद्यापीठाच्या वैद्यकीय महाविद्यालयाचे प्राध्यापक होते. वयाने व अनुभवानेही बरेच सीनियर .. प्रक्टीकल परीक्षा व viva दरम्यान आम्ही एम.डी. अंतिम वर्षांचे विद्यार्थी examiner सोबत बसायचो जेणे करून आम्हालाही त्याचा भविष्यात उपयोग होईल. ह्या प्राध्यापक महोदया सोबत मी आणि माझा मित्र होतो.. तर प्रक्टीकल परीक्षा सुरु झाली . Viva साठी आलेल्या प्रत्येक विद्यार्थ्यांची संपूर्ण नाव , गाव, राज्यासहित पूर्ण ओळख हे प्राध्यापक महोदय करून घ्यायचे. हा प्रकार आमच्या साठी नवीनच होता कारण आमच्या दोघांच्याही पदवी महाविद्यालयात असा प्रकार कधी ऐकण्यात/पाहण्यात आला नव्हता. आमचं दिल्लीतील महाविद्यालय हि एक केन्द्रीय संस्था असल्यामुळे बहुतांशी विद्यार्थी उत्तरेतील असली तरी संपूर्ण भारतातून तसेच काही विद्यार्थी हे नेपाळ, भूतान, मालदीव सारख्या वैद्यकीय शिक्षणाच्या चांगली सोयी नसलेल्या सार्क देशातून आलेली होती. तर पूर्ण ओळख करून झाल्यानंतर ते प्राध्यापक मुलाच्या जात व धर्म विषयक अंदाज घ्यायचे.. अर्थातच तो अंदाज विद्यार्थ्यांच्या आडनावावरुन असायचा जसे शर्मा, मिश्रा, भाराद्वाज, त्रिवेदी- ब्राह्मण; गर्ग, जिंदाल, अग्रवाल – अग्रवाल; गुप्ता,साहू वगैरे- वैश्य, सक्सेना,प्रधान,श्रीवास्तव- कायस्थ, तसेच विविध आडनावावरून यादव, जाट, रजपूत वगैरे वगैरे. दलित तसेच आदिवासी मुलं थोडं awkward वाटून उत्तर द्यायचे. एका महेर आडनावाच्या मुलाला त्याची ओरिजिन हि महाराष्ट्रातील महार समाजापासून आहे इथपासून ते त्याच्या जातिची इत्यंभूत सर्व माहिती सांगितली. त्या विद्याथ्याचा चेहर्यावर नाराजी स्पष्ट दिसत होती. मुस्लिम विद्यार्थ्यासाठी टिपिकल प्रश्न असायचे जसे, मुलायमसिंग ह्यांचा मतदारसंघ तुझ्या गावापासून किती दूर आहे ? मग मुलायम सिंग विषयी बरीच प्रश्नोत्तरे व्हायची.. विद्यार्थांना समजायचे की नाही माहित नाही पण आम्हाला मात्र कळायचं… एका नेपाळ च्या विद्यार्थ्याला तर सरांनी तिथल्या कम्युनिस्ट राजवटीवरून बरचं सुनावलं तो बिचारा नुसतं ऐकत होता. एक भारद्वाज नावाचा मुलगा आला- सरांनी त्याला ब्राह्मण समजून बोलणं सुरु केलं तो मधेच थांबवत म्हणाला,'सर मै सिख हुँ। मेरे परदादा ने sikhism स्वीकार किया हें'। त्याला Sikhism स्वीकारायची गरजच काय होती इथपासून ते शीख धर्मातील अंतर्गत विवादांपर्यँत व्याख्यान दिलं गेलं. अर्थात विद्यार्थ्यांना परीक्षा सुरु असल्यामुळे फार काही प्रतिवाद करता आला नाही.. एवढं सगळं झाल्यावर सर एखादा अभ्यासक्रमावर आधारित प्रश्न विचारायचे. पहिला विद्यार्थी रूम बाहेर गेल्यानंतर दुसरा विद्यार्थी आत येई पर्यंत सर आम्हाला २-३ सूचक वाक्य बोलायचे जसे, मुस्लिम विद्यार्थी येऊन गेल्यावर – पता हें तुम्हे hinduism के असली दुश्मन मुस्लिम नहीं बल्कि बौध्द थे ! वगैरे वगैरे.. मध्यंतरी त्यांनी माझ्या जातीच्या अंदाज बांधलाच होता.. मित्र आडनाव वापरत नसल्यामुळे त्याच्या जातीचा मात्र त्यांना अंदाज बांधता आला नसावा. अश्या प्रकारे परीक्षा संपली पण आम्हाला बातमी मिळाली कि ६ महिन्यानंतर होणाऱ्या आमच्या एम डी च्या अंतिम परीक्षेसाठी हेच सर external examiner म्हणून येणार आहेत ( ते पुढे external म्हणून आले नाहीत). तेंव्हा मित्राचा चेहरा पडला होता… माझ्याकडं सरांना रेल्वे स्टेशन वर सोडायची जबाबदारी दिली होती , मित्र मला म्हणाला , “अमोल please try to convey sir that I don’t belong to SC/ST.” बाकी जास्त न सांगणे.. 2

No comments:

Post a Comment

Living Beyond Logic

For centuries, human beings have been thinking about how we make sense of the world. As someone who has always leaned towards science and ...